मुंबई : शिवसेनेच्या कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत मोठे संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. 


भाजपला धक्का


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचा सर्वात जुना मित्र आणि एनडीएचा भाग असलेल्या शिवसेनेने २०१९ ची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. युती टिकवण्यासाठी शिवसेनेने नेहमी प्रयत्न केला. पण भाजपने त्यांना खालचा दर्जा दिला. शिवसेना आता स्वाभिमानाने चालेल असं शिवेसेनेने म्हटलं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक शिवसेना एकटीच लढणार आहे.


भाजपवर जोरदार टीका


बैठकीनंतर बोलतांना उद्धव ठाकरेंनी भाजपला धारेवर धरलं. पाकिस्तानच्या मुद्द्यावर उद्धव यांनी टीका केली. निवडणुकीत पाकिस्तान आठवतो असं देखील त्यांनी म्हटलं आहे. हा सगळा प्रकार संताप येतो असं देखील त्यांनी म्हटलं. नेव्हीवर केलेल्या नितीन गडकरींच्या वक्तव्यावर देखील उद्धव यांनी टीका केली. ५६ इंचाच्या छातीत शौर्य देखील असं त्यांनी म्हटलं आहे. सत्तेची हवा सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात गेल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


प्रत्येक राज्यात निवडणूक लढवणार


प्रत्येक राज्यात निवडणूक लढवण्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवू असं देखील त्यांनी म्हटलं आहे. गाय मारणं तसं थापा मारणं देखील पाप आहे. असं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही असं उद्धव यांनी म्हटलं आहे, सत्तेसाठी भांडी घासणारं हिंदुत्व आम्हाला नको. आपल्या परिने हिदुत्त्वाचा अर्थ लावला जातोय.