मुंबई: मुंबई विमानतळाच्या गेटवर आज शिवसैनिकांनी अदानी एअरपोर्ट नाव असलेला बोर्डची तोडफोड केली. मुंबई विमानतळावर अदानी ग्रूपच्या नावाच्या बोर्ड दिसल्याने आक्रमक शिवसैनिकांनी तोडफोड केली. या वादावर आता अदानी ग्रूपनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. या स्पष्टीकरणात शिवसेनेलाच जबाब


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत विमानतळावरील तोडफोडीनंतर अदानी ग्रृपनं लागलीच स्पष्टीकरण दिलं आहे. मुंबई विमानतळावरील 'तो' फलक नियमानुसार असून विमानतळाच्या मूळ नावाला धक्का लावण्याचा कोणताही हेतू नव्हता असं अदानी ग्रृपनं आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे. 


विमानतळ प्राधिकरणाचे नियम पाळून नावाचं ब्रँडिंग करण्यात आलं आहे. असं स्पष्टीकरण अदानी ग्रृपनं झी 24 तासकडे दिलं आहे. त्यामुळे सर्व नियम पाळून मुंबई विमानतळावर हा बोर्ड लावण्यात आल्याचं अदानी ग्रूपनं सांगितलं आहे. 


नेमकं काय घडलं?
अदानी एअरपोर्ट नाव असलेला बोर्ड दिसताच शिवसैनिकांनी या बोर्डची तोडफोड केली. अदानी एअरपोर्ट असा बोर्ड लावल्याने शिवसैनिक आक्रमक झाले होते. अदानी एअरपोर्ट नाव असलेला बोर्ड शिवसेनेनं तोडला. हायवेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेलं एअरपोर्टचं प्रवेशद्वार आहे. तिथे अदानी नावाचा बोर्ड नव्यानं लावण्यात आला होता, तो शिवसैनिकांनी फोडला. 


या बोर्डला शिवसैनिकांचा आक्षेप होता. त्यामुळे त्यांनी याची तोडफोड केली होती. शिवसैनिकांनी तिथे मोठ्य़ाने घोषणाबाजी देखील केली. एअरपोर्टला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव दिलं आहे, तर मग अदानी यांच्या फलकाची गरज काय? असा सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला होता.