मुंबई : येथील पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेने आघाडी घेतली आहे. तर मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील यांनी सलग तिसऱ्यांदा विजयाची नोंद केलेय. दरम्यान, अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तर कोकणात मोठी चुरस पाहायला मिळत आहे. भाजप आणि शिवसेनेत कॉंटे की टक्कर दिसत आहेत. सध्या शिवसेनेने आघाडी घेतली आहे. मात्र, चित्र काय लागणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानपरिषदच्या मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. यावेळी मतदान झालेल्या ८००० पेक्षा जास्त मतांपैकी ४ हजार पेक्षा जास्त मते कपिल पाटील यांना मिळाली आहेत. मात्र अजून विजयाची औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही. तर मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी विजयी आघाडी घेतली आहे. यामुळे शिवसेनेने पुन्हा एकदा मुंबई पदवीधरचा गड राखल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.


कोकण पदवीधर


कोकण पदवीधरच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून शिवसेनेचे संजय मोरे यांनी २००० पेक्षा जास्त मतांची आघाडी घेतली आहे. तर भाजपचे निरंजन डावखरे दुसऱ्या स्थानावर असून राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नजीब मुल्ला तिसऱ्या स्थानावर आहेत. मात्र या तिन्ही उमेदवारांमध्ये मतांचे अंतर खूप कमी असल्याने काटे की टक्कर होणार असल्याचं दिसून येत आहे.