मुंबई : महावितरणने आपल्या ग्राहकांच्या खिशावर अधिकचा भार टाकला आहे. महावितरणचे जवळपास दोन कोटी ५५ लाख वीजग्राहक आहेत. त्यांना वाढीव वीजबिलाचा भार पडणार आहे. राज्यातील महावितरणच्या ग्राहकांवर मार्च महिन्यात पुन्हा एकदा इंधन समायोजन आकारापोटी वाढीव वीजबिलाचा भार पडणार आहे. फेब्रुवारीच्या वीजवापरापोटी घरगुती ग्राहकांवर प्रति युनिट ६१ पैसे ते १.६२ रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महावितरणने वीजभार वाढविण्याचा निर्णय घेतल्याने १०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांना आता ६१ रुपये, ३०० युनिट वीजवापरणाऱ्यांना ४११ रुपये तर ५०० युनिट वीज वापरणाऱ्यांना ६८५ रुपये जादा मोजावे लागतील. दरम्यान, याआधी जानेवारीच्या वीज वापरासाठीही ५५ पैसे ते १.४० पैसे प्रति युनिट असा इंधन समायोजन आकार लावण्यात आला होता. आता पुन्हा वीजबिल भार लावण्यात आलाय.


राज्य महावितरणची वीज वापरण्याची संख्या सर्वाधिक आहे. मुंबईतील पूर्व उपनगरांसह संपूर्ण राज्यभरात वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणचे अडीच कोंटीपेक्षा जास्त वीजग्राहक आहेत. नोव्हेंबरमध्ये वीजखरेदीसाठी झालेल्या जादा खर्चाचा ताळमेळ बसावा म्हणून हा अधिकचा भार ग्राहकांच्या माथी मारण्यात आला आहे. म्हणून हा इंधन समायोजन आकार लावण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता यापुढे वाढीव वीजबिल येणार आहे.