मुंबई : लोकल ही मुंबईची धावती नस आहे. ज्यामुळे कोणताही व्यक्ती मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास करु शकतो. सध्या कोरोनाकाळातील निर्बंधांमुळे प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे. परंतु तरी देखील लाखो लोक आज लोकलने प्रवास करत आहेत. महिला देखील कामावर जाण्यासाठी लोकलचा उपयोग करताता आणि दररोज यातून प्रवास करतात. परंतु महिलांसंदर्भात अशा बातम्या समोर येऊ लागल्या आहेत की, ज्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थिती केले जात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकलमध्ये घडत असलेली सगळी प्रकरणे पाहाता रेल्वेने महिलांसाठी सुरक्षेची काळजी घेतली, ज्यासाठी फोननंबर, महिला डब्यात पोलिस आणि सीसीटीव्ही सारख्या गोष्टींचा अवलंब केला गेला, ज्यामुळे ही प्रकरणे कमी झाली असली तरी, त्याला संपूर्णपणे आळा बसलेला नाही.


एक रेल्वे लोकल संदर्भात अशी बातमी समोर आली आहे, जी वाचून तुमच्या तळपायाची आग मस्तकात तर जाईल, याशिवाय या घटनेमुळे  पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थीत केले जात आहेत.


समोर आलेल्या माहितीमध्ये असे सांगितले जात आहे की, एक नराधम लोकालच्या महिला डब्यात शिरुन हस्तमैथुन (Mastrubation) करत होता, त्याच्या या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि लोकं यावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.



हा व्हिडीओ नक्की कधीचा आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या नराधमावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. 


परंतु हा व्हिडीओ जास्त जुना नसुन सध्याचा असल्याचे स्पष्ट होत आहे, कारण या डब्यातील महिलांना चेहऱ्यावरती मास्क लावला आहे.


या व्हिडीओमध्ये एक पुरुष महिला डब्यात असल्याचे दिसत आहे, हा नराधम लोकलच्या दारात उभा आहे आणि तो तेथे उभा राहून  हस्तमैथुन (Mastrubation) करत आहे. त्याचे हे कृत्यपाहून महिला घाबरलेल्या असल्याचे दिसत आहे.


परंतु महिलांनी नंतर त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो महिलांच्या विरोधाकडे लक्ष देत नव्हता. तसेच आपण काही तरी चूकीचे करत आहोत असा भाव देखील त्याच्या चेहऱ्यावरती दिसत नाही.


हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्या व्यक्तीचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिसांनी सांगितले आहे की, आम्ही या व्यक्तीवर कठोरातील कठोर कारवाई करु.