Shocking News : नवी मुंबईत धक्कादायक घटना, दारुड्याच्या हाती शाळेच्या बसचं स्टेअरिंग
नवी मुंबईतल्या प्रतिष्ठित शाळेच्या बसमध्ये अनेक विद्यार्थी होते, सुदैवाने यात कुणी जखमी झालं नाही, दारुड्या बस चालकाला केलं पोलिसांच्या स्वाधिन
स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : नवी मुंबईतल्या उलवेमध्ये (Navi Mumbai Ulwe) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उलवेमधील एका शाळेच्या बसचं (School Bus) स्टेअरिंग चक्क एका दारुड्याच्या हातात होतं. स्कूल बस चालक सकाळीच दारूच्या नशेत शाळेची बस चालवत होता. उलवे मधील IMS शाळेचीही बस होती. नेहमीप्रमाणे सकाळी शाळेची बस विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत निघाली. पण बस चालकाचं बसवर नियंत्रण नव्हतं. बस एका रिक्षाला धडकल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही गोष्ट कळताच स्थानिक नागरिक जमा झाले आणि त्यांनी बस चालकाला पोलिसांच्या हवाली केलं. बस विद्यार्थ्यांनी पूर्ण भरली होती, सुदैवाने यात कोणताही विद्यार्थी जखमी झाला नाही.