Leopard In Mumbai Film City: सगळं ठरल्याप्रमाणे सुरू होतं.. सिरीयलच्या अभिनेत्री आपलं पात्र साकारण्यास तयार होत्या. सकाळचे 9 वाजून 45 मिनिट झाली असावी, तेवढ्यात सेटवर एक खराखुरा बिबट्या (Leopard) आला अन् सर्वांचीच भंबेरी उडाली. बिबट्याने सेटवरील एका कुत्र्यावर हल्ला केला. त्यात कुत्र्याचा मृत्यू देखील झाला. बिबट्या सेटवर आल्याचं पाहून त्रेधातीरपिट उडाली. त्यावेळी घटनास्थळी उपस्थित लोकांनी तातडीने ही माहिती अखिल भारतीय सिने कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांना दिली. त्यानंतर बिबट्या धूम ठोकली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा हा बिबट्या फिल्मसिटीमधल्या (Mumbai Film City) सेटमध्ये शिरला त्यावेळी तिथे तब्बल 300 जण होते. सगळ्यांचा जीव धोक्यात आला होता. या सगळ्यांचा जीव वाचल्याची माहिती मिळाली आहे. मात्र बिबट्यानं सेटवर झोपलेल्या एका कुत्र्याचा फडशा पाडलाय. सेटवर उपस्थित असलेल्या सर्वांना कसंबसं बाहेर काढण्यात यश आलं. बिबट्याचा हा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय. 


पाहा Video



बिबट्या सेटमध्ये शिरल्याची ( Leopard entered in Mumbai Film City) ही पहिलीच घटना नाही. आजूबाजूला जंगल असल्याने अनेकदा असे प्रकार घडले आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आजच्या घटनेनंतर संपूर्ण फिल्मसिटीमध्ये बिबट्याची दहशत आहे. मात्र, आजपर्यंत सरकारकडून ठोस पाऊलं उचलण्यात आलेली नाहीत.  


आणखी वाचा - Dudhsagar Waterfall: विकेंडला दूधसागर धबधब्याला जाताय? आधी 'हा' Video पाहाच!


दरम्यान, काही काळ मालिकेचं शूटिंग (Shooting of the serial) थांबवावं लागलं. सध्या वनविभाग आणि पोलिसांचे पथक बिबट्याच्या शोधात गुंतले आहे. याआधी गेल्या आठवड्यातही असेच एक प्रकरण समोर आले होते, जिथे एका टीव्ही मालिकेच्या सेटवर अजगर आला होता. फिल्मसिटी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्रात येते. अशा परिस्थितीत अनेकदा मालिकांच्या सेटवर प्राणी शिरल्याचं दिसून येतं.