१३ वर्षाची मुलगी २७ आठवड्यांची गर्भवती
चारकोप परिसरात अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. १३ वर्षाच्या मुलीला वजन वाढलं या कारणाने पालकांनी डॉक्टरांकडे नेलं. आणि त्यांच्या निदानामुळे पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. १३ वर्षाची ही मुलगी २७ आठवड्यांची गरोदर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबई : चारकोप परिसरात अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. १३ वर्षाच्या मुलीला वजन वाढलं या कारणाने पालकांनी डॉक्टरांकडे नेलं. आणि....
त्यांच्या निदानामुळे पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. १३ वर्षाची ही मुलगी २७ आठवड्यांची गरोदर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित मुलगी साडेसहा महिन्यांची गर्भवती असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हा धक्कादायक प्रकार मुंबईतल्या चारकोप परिसरात घडला आहे. पालकांनी मुलीला तपासणीसाठी दवाखान्यात नेलं. थायरॉईडमुळे लेकीचं वजन वाढत असल्याचं संशय पालकांना होता. डॉक्टरांनी त्यांना मुलीची सोनोग्राफी करायला सांगितली. सोनोग्राफी रिपोर्टमध्ये मुलगी साडेसहा महिन्यांची प्रेग्नंट असल्याचं समजलं.
मुलीला याबाबत काहीच कल्पना नसल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसात तक्रार केल्यावर अज्ञाताविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता हा प्रकार नेमका कुणी केला असा प्रश्न मुलीच्या पालकांना पडला आहे. मुलीच्या गर्भपातासाठी तिचे पालक डॉक्टरांच्या मदतीने सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहेत. अल्पवयीन मुलीच्या गर्भपातासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असेल.