मुंबई : देशातील सर्वात मोठे व्यावसायिक मुकेश अंबानींचा मुलगा आकाश अंबानीची प्री एन्गेजमेंट पार्टी पार पडली. मुंबईतील एंटीलिया हाऊसमध्ये या शानदार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत देशातील मोठमोठे व्यावसायिक आणि बॉलिवूड सेलिब्रेटीज उपस्थित होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्री एन्गेजमेंट पार्टीत श्लोकाने गुलाबी रंगाचा लेहंगा तर आकाशने निळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.  या सोहळ्यात नीता अंबानींनी बहारदार नृत्य सादर केले. त्यानंतर गुलाबी लेहंग्यात सुंदर दिसणारी ईशा घुमरवर थिरकली. यावरुन अंबानी परिवारातील नृत्याची कला दिसून येते. पण अंबानींची होणारी सूनही काही कमी नाही. ती देखील जबरदस्त डान्सर आहे. पहा तिचा हा व्हिडिओ...



हा व्हिडिओ श्लोकाची बहीण दिया मेहताच्या लग्नातील आहे. यावरुन अंबानी परिवारातील मुली-सूना डान्समध्ये माहीर असल्याचे दिसते. आकाश आणि श्लोका डिसेंबरमध्ये विवाहबंधनात अडकतील.