कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: काही दिवसांपूर्वीच केईएम रुग्णालयात मृतदेहांशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याचा धक्कादायक व्हीडिओ समोर आला होता. महापालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेत भविष्यात असे प्रकार घडणार नाही, याची ग्वाही दिली होती. मात्र, आता केईएम रुग्णालयाती आणखी एक खळबळनजक प्रकार समोर आला आहे. केईएमच्या कोवीड अतिदक्षता विभागातील नर्स आणि वॉर्डबॉय तासोनतास गायब असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अतिदक्षता विभागातील रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केरळ महाराष्ट्राच्या मदतीसाठी धावला; १०० डॉक्टर्सचे पथक मुंबईला रवाना

यासंदर्भात एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओत तहानेने व्याकूळ झालेली एक महिला रुग्ण पाण्याची रिकामी बॉटल आपटताना दिसत आहे. मात्र, त्याठिकाणी नर्स किंवा वॉर्डबॉय हजर नसल्याचे दिसत आहे. अनेक नर्स आणि वॉर्डबॉय दांड्या मारत असल्याने केईएममध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल सुरु आहेत. अखेर रुग्णांचे नातेवाईकच जीवाचा धोका पत्कारुन मदतीसाठी पुढे सरसावताना दिसत आहेत. 


केईएम रुग्णालयातून कोरोनाचा पेशंट हरवला

कोवीड संकट सुरू झाल्यापासून रूग्णालयातील सुमारे २५० नर्सेस अनधिकृतरित्या गैरहजर असल्याचे समजते. मात्र, केईएम प्रशासनाकडून या सगळयांवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे कामावर नियमितपणे येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण पडत आहे. सहा तासांऐवजी ७ तासांच्या दोन शिफ्ट आणि नाईट शिफ्ट १० तासांची केल्यानं गोंधळ वाढला. तसेच नर्सेसना रोज एका नव्या वॉर्डमध्ये शिफ्ट लावली जाते.  सध्या प्रत्येक कोवीड वॉर्डमध्ये डॉक्टरांची १०० टक्के हजेरी असते. परंतु नर्सेस ५० टक्के आणि वॉर्डबॉय ३३ टक्केच हजर असतात.