प्रशांत अनासपुरे, मुंबई : राज्य सरकारच्या पर्यटन विभागातर्फे दोन दिवसीय एलिफंटा महोत्सव घेण्यात आला. एलिफंटा लेणी पाहण्यासाठी लवकरच पर्यटकांसाठी 'रोप वे'ची सुविधा करण्यात येणार असल्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांनी सांगितले. एलिफंटाकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे हा प्रवास अधिक सोपा व्हावा या उद्देशाने 'रोप वे' लावण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथे एलिफंटा महोत्सवाचे मोठ्या उत्साहात  उदघाटन झाले. राज्य सरकारतर्फे दोन दिवस हा महोत्सव साजरा करण्यात येतो. गायक कैलाश खेर यांच्या बहारदार सुरांच्या साथीत गेट वे ऑफ इंडियाचा संपूर्ण परिसर संगीत मैफलीत रंगून गेला होता.  एलिफंटा महोत्सवाच्या निमित्ताने रसिकांनीही गेट वे वर मोठी गर्दी केली होती. 


महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गायक राहुल देशपांडे, प्रियंका बर्वे आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या संगीत मैफलीसह घारापुरी लेणी इथे हेरिटेज वॉकसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे मंत्री जयकुमार रावळ यांनी यावळी सांगितले.