मुंबई : शहरातील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांच्या सहायतेसाठी ५१ लाख रुपयांचा निधी तर मुंबईतील पोलीस रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक उपकरणांच्या खरेदीसाठी दीड कोडी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा निधी संबंधितांकडे सुपुर्त करण्यात आला.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांच्या सहायतेसाठी ५१ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सीआरपीएफचे पोलीसमहानिरीक्षक संजय लाटकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर आणि मान्यवर उपस्थित होते. तर मुंबईतील पोलीस रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक उपकरणांच्या खरेदीसाठी मंदिर न्यासाच्यावतीने दीड कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.



मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलास ५१ लाख रुपयांचा निधी सुर्पर्द केला. या निधीतून शहीद ४० जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख २७ हजार ५०० रुपयांची मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली.