मुंबई : मुंबईचं आराध्य दैवत असणा-या श्रीसिद्धीविनायकाच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या दागिन्यांचा आज लिलाव होतोय. वर्षभरात बाप्पाला मिळालेलं नवसाचं दान त्याच्या भक्तांना लिलावाद्वारे विकण्यात येतं.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी ११ पासून या लिलावाला सुरुवात झालीये.. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत लिलावाची प्रक्रिया सुरु असणार आहे. त्यामुळे श्रींचे दागिने खरेदी करण्याची इच्छा असणा-या भाविकांना ही  सुवर्णसंधी असणार आहे. यापूर्वीचा लिलाव अक्षयतृतीयेच्या शुभमुहुर्तावर एप्रिल महिन्यात करण्यात आला होता. 


या लिलावात बाप्पाच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्या, चांदीच्या अंगठ्या, प्रतिमा, लॉकेट, दुर्वा, सोनसाखळ्या, हार, मुकुट अशा आभुषणांचा समावेश असतो. गणेशभक्त मोठ्या श्रद्धेनं या लिलाव प्रक्रियेत सामील होतात.