मुंबई : महाराष्ट्रातील एक मोठं नाव आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधू ताई सपकाळ यांचं आज निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्यावर्षी सिंधूताईंना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला त्यावेळी सिंधूताईंनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांच्या आयुष्यातील माईचा प्रपंच कसा सुरु झाला याची कहाणी सांगितली होती.


सिंधूताईंनी सांगितलं की, ‘पोटात असलेली भूक ही माझी प्रेरणा होती. कधी भूक इतकी अनावर व्हायची की रस्त्यावरील दगड चावून खावेसे वाटायचे’


माझ्याप्रमाणेच अवतीभवती बरीच लोकं भूकेने व्याकूळ असलेलं लक्षात आलं. यानंतर मी त्यांना माझ्यातला घासातला घास दिला आणि त्याचं क्षणी माईचा प्रपंच सुरू झाला. यामधून मी हजारो अनाथांची माय झाले, असंही सिंधूताई पुढे म्हणाल्या.


आपल्या सामाजिक कार्याने महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे नाव जागतिक पातळीवर गाजविणाऱ्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे आज रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.


सिंधुताई यांना प्रकृती ठीक नसल्याने २४ डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २५ डिसेंबरला शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत कमी अधिक सुधारणा होत होती. त्यांनतर गेल्या आठ दिवसांपूर्वी त्यांना गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आज रात्री ८ वाजून १० मिनिटांनी हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.