गायक आदित्य नारायणला वर्सोवा पोलिसांनी केली अटक
रस्ते अपघात प्रकरणात गायक आदित्य नारायण याला पोलिसांनी अटक केली आहे. आदित्यला वर्सोवा पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण ट्रॅफीक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई : रस्ते अपघात प्रकरणात गायक आदित्य नारायण याला पोलिसांनी अटक केली आहे. आदित्यला वर्सोवा पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण ट्रॅफीक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार आदित्यविरोधात आयपीसी कलम २७९ आणि ३३८ अंतर्गत केस दाखल करण्यात आली आहे. त्याला वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन जाण्यात आले आहे.
आदित्य नारायणने आपल्या गाडीने एका ऑटो रिक्षाला धडक मारली. यात दुर्घटनेत रिक्षा चालक आणि त्यातील प्रवासी जखमी झाले आहेत. हे पहिले प्रकरण नाही. अनेक चुकीच्या कारणांनी तो चर्चेत होता.
गेल्या वर्षी एक एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्याला आदित्यने धमकी देण्याची प्रकरण समोर आले होते. हे प्रकरण रायपूरमध्ये घडले होते. सामनासाठी अतिरिक्त पैसे मागितल्यामुळे कर्मचाऱ्याचे आणि आदित्यचे भांडण झाले होते. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होता. तसेच २०११ मध्ये अश्लिल कमेंट केल्याने एका मुलीने त्याला कानाखाली लगावली होती.