मुंबई : काहीवेळा असे प्रसंग घडतात ज्यावर खरचं कोणाचा विश्वास बसणार नाही. ते प्रसंग इतके भयावह असतात जणू काही निसर्गाचा प्रकोपचं. सध्या व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ सर्वत्र चर्चेत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल. आपल्या सर्वांना माहिती पहिला पाऊस झाला की मुंबईची परिस्थिती कशी होते. संपूर्ण जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होवून जातं. याचं संदर्भातील एक घटना तुम्हाला धक्का पोहोचवेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओमध्ये एक कार पार्किंगमध्ये उभी असल्याचं तुम्हाला दिसत आहे. त्यानंतर ती कार अचानक जमीनी खाली जाते. हा व्हिडिओ मुंबईतला आहे. अत्यंत भयंकर अशी ही घटना आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. जर तुम्ही ही घटना एखाद्याला सांगितली असती तर कदाचित त्या व्यक्तीचा विश्वास बसला नसता. 



पण हा व्हिडिओ सर्व सत्य सांगत आहे. जमीनीत गेलेला ही कार काही वेळाने काढण्यात आली. पण कार जमीनीत गेली कशी? मुंबईत बिल्डर बिल्डिंग बनवतात की दलदल? असे अनेक मोठे प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.