मुंबई : सायन -पनवेल महामार्गावर वाशी खाडी पुलावर मुंबईच्या दिशेने जाणा-या मार्गावर मोठी क्रेन बंद पडली. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झालीय.


पाच तासांपासून ही क्रेन बाजूला करण्याचं काम सुरु आहे. वाहतूक धिम्यागतीनं सुरु आहे. यामुळे वाशी खाडी मार्ग ते वाशी गाव अशा दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात.