दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबई वगळून इतर महानगर क्षेत्रांसाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील प्रमुख मोठ्या शहरांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू होणार आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तब्बल 5 वर्षानंतर या प्राधिकरणाची बैठक झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बैठकीला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, गृहनिर्माण राज्य मंत्री सतेज पाटील उपस्थित होते. 



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सह्याद्री अतिथिगृहात मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणि धारावी पुर्नविकास प्रकल्पांसंदर्भात बैठक घेण्यात आली.


झोपडपट्टीमुक्त शहरे करण्यासाठी काही नियम शिथील करावे लागतील. त्यात काही आमुलाग्र बदल करावे लागतील. मुंबईत ३७० एसआरएचे प्रकल्प अडकलेले आहेत. कोवीडचा सर्वाधिक फैलाव झोपडपट्टी परिसरात झाला, साथीचे आजारही तिथं जास्त फैलावतात. अडकलेले सर्व प्रकल्प मार्गी लावले जातील असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर सांगितले.


धारावी प्रकल्पात मोठ्या अडचणी आहेत, रेल्वेची जमीन आहे. तो यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सरकार सकारात्मक व गांभीर्यानं पाहत असल्याचेही ते म्हणाले.