आताची मोठी बातमी! शिंदे गटाच्या मेळाव्याला ठाकरे कुटुंबातील `या` व्यक्तीची उपस्थिती
बीकेसीत लाखोंची गर्दी, पाहा असा असणार शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा कार्यक्रम
Shinde Group Dussehra Melava : दसरा मेळावा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) असे शिवसेनेचे (Shivsena) हे दोन वेगवेगळे मेळावे होणार आहे. ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्क इथे होत आहे. तर शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर होत आहे. दोन्ही मैदानावर लाखो शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath shinde) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काय बोलणार, याकडे सर्व शिवसैनिकांचे लक्ष लागलं आहे.
शिंदे गटाच्या मेळाव्याला ठाकरे कुटुंबातील व्यक्ती उपस्थित रहाणार असं बोललं जात होतं. ती व्यक्ती आता समोर आली आहे. शिंदेंच्या मेळाव्याला स्मीता ठाकरे यांनी हजेरी लावली आहे. स्मीता ठाकरे बीकेसी मैदानात दाखल झाल्या आहेत. स्मीता ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यानंतर त्या शिंदेंच्या दसऱ्या मेळाव्यालाही उपस्थित रहाणार अशी शक्यता वर्तवली जात होती. ती शक्यता आता खरी ठरली आहे.
असा असेल शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा कार्यक्रम
5.30 वाजता नंदेश उमप यांच्या कार्यक्रमने सुरवात
6.30 वाजता शिंदे गटाच्या प्रवक्त्यांचे भाषणाला सुरुवात
7.25 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मेळावा ठिकाणी येताच 111 साधूनकडून शंख नाद केला जाणार
मुख्यमंत्री शिंदे यांना अयोध्या येथून आलेल्या साधूंकडून चांदीचं धनुष्य आणी गदा दिली जाईल आणी आता हिंदुची धुरा तुम्ही सांभाळा असे आशीर्वाद दिली जातील
त्यानंतर 40 आमदार 12 खासदार यांच्या कडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला जाईल
8.15 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरु होईल, साधारण 1 तास भाषाण चालणार आहे
मुख्यमंत्री शिंदे यांचं ट्विट
दसरा मेळाव्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं असून त्याची चांगलीच चर्चा होत आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय " मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे "- हरिवंशराय बच्चन. यात त्यांनी #विचारांचेवारसदार असं हॅशटॅग दिलं आहे.