मुंबई : सॉफ्ट पॉर्नोग्राफी केस (Soft Pornography Case) प्रकरणी ताब्यात असणाऱ्या राज कुंद्रा याच्या संकटांमध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. त्याच्यावर होणारी कारवाई दिवसागणिक आणखी कठोर होत असून, आता मुंबई गुन्हे शाखेनंही राज कुंद्राला पेचात पाडलं आहे. गुन्हे शाखेनं कारवाई करत राज कुंद्रा याचं सिटी आणि कोटक महिंद्रा या बँकेतील खातं फ्रीज केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोटक महिंद्रामध्ये होते 1.13 कोटी रुपये 
राज कुंद्रा (Raj Kundra) याच्या नावे कोटक महिंद्रा (Kotak Mahindra Bank) या बँकेमध्ये तब्बल 1 कोटी 13 लाख रुपये इतकी रक्कम जमा होती असं कळत आहे. इतकंच नव्हे तर, राज कुंद्रा याला अॅप्पल कंपनीकडून 1.64 कोटी रुपये मिळाले आहेत. तर, गुगलकडून त्याला दिलेल्या पैशांसंबंधीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. 


क्राईम ब्रांचकडून फॉरेन्सिक ऑडिटरची नियुक्ती 
24 जुलै रोजी राज कुंद्रा याच्या ऑफिसवर धाड टाकल्यानंतर अनेक परदेशी व्यवहारांची कागदपत्र तेथून हाती आली. कुंद्राच्या मोबाईल आणि रायनच्या Mac Book मधून Hotshots चा नफा आणि पेमेंटशी निगडीत काही चॅट समोर आले आहेत. ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात इंटरनॅशनल ट्रांझॅक्शन झाल्याची माहिती उघड होत आहे. सध्या क्राईम ब्रांचकडून फॉरेन्सिक ऑडिटरही नियुक्त करण्यात आले असून आता त्यांच्याकडूनही सदर प्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. 



दरम्यान, राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रायन थॉर्पच्याही न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. पॉर्नोग्राफी कनेक्शन समोर आल्यापासून राज कुंद्रा वादाच्या भोवऱ्यात अडकला.