मुंबई : २१ जून २०२० रोजी सूर्यग्रहण दिसणार आहे. हे सूर्यग्रहण भारतातूनही दिसणार आहे. हे सूर्यग्रहण (Solar Eclipse) कंकणाकृती असणार आहे. सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. कंकणाकृती या सूर्यग्रहणात चंद्र  हा सूर्याच्या समोर येतो आणि त्यामुळे सूर्याचा काही भाग झाकला जातो आणि सूर्य हा अंगठी कारखा दिसतो याला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. तसेच रिंग ऑफ फायर (Ring of Fire) असेही म्हटलं जातं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज २१ जून रोजी सूर्यग्रहण असून हे वर्षातील पहिलं सूर्यग्रहण आहे. सूर्यग्रहण सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी सुरू होणार आहे. दुपारी ३ वाजून ५ मिनिटांपर्यंत राहिल. अयोध्यामध्ये सूर्यग्रहण हे २० जूनच्या रात्री १० वाजून ३१ मिनिटांनी सुरू झाला आहे. रविवारी हे ग्रहण दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी संपेल. 



संपूर्ण भारतातून दिसणारं सूर्यग्रहण हे अनेक कारणांनी खास मानलं जात आहे. विशेष म्हणजे दरवर्षी 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस मानला जातो. तर जगभरात 21 जून हा दिवस जागतिक योगदिन म्हणूनही साजरा करण्यात येतो. तसेच पुढची जवळपास अकरा वर्ष भारतातून कंकणाकृती ग्रहण दिसणार नाही.


पाहा कोणत्या शहरात किती वाजता दिसणार?


मुंबई – सकाळी १०.०१ ते दुपारी १.२८
पुणे – सकाळी १०.०३ ते दुपारी १.३१
नाशिक – सकाळी १०.०४ ते दुपारी १.३३
नागपूर – सकाळी १०.१८ ते दुपारी १.५१
औरंगाबाद – सकाळी १०.०७ ते दुपारी १.३७