राज्यात अनेकांना पाहता आलं नाही सूर्यग्रहण...कारण
सूर्यग्रहण पाहण्यासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांना हे ग्रहण पाहता आलं नाही. तर नागपुरातही
मुंबई : ढगाळ वातावरण...रिमझिम पावसाच्या सरी...आणि सूर्याभोवतालच्या हालचाली दुर्बिनीतून पाहण्याची वाढती उत्सुकता...वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण पाहण्यासाठी खगोलप्रेमींसह सर्वसामान्य नागरीक आणि विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती. मुंबईत अनेक ठिकाणी नागरिकांनी सूर्यग्रहण पाहण्यासाठी गर्दी केली होती. मात्र ढगाळ वातावरणामुळे बऱ्याच जणांचा हिरमोड झाला.
काही ठिकाणी मात्र थोडा वेळ का होईना ढगाळ वातावरण दूर झालं आणि सूर्यग्रहण पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळाली. ठाण्यातही खगोलप्रेमींसह विद्यार्थ्यांनी सूर्यग्रहण पाहण्यासाठी गर्दी केली होती.
नाशिक आणि कोल्हापूरात विद्यार्थी आणि खगोलप्रेमी एकत्र जमले होते. तर पुण्यात ढगाळ वातावरणामुळे अनेक ठिकाणी खगोलप्रेमींचा हिरमोड झाला.
अनेक भागात रिमझिम पावसाच्या सरींमुळे सूर्यग्रहण पाहण्यासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांना हे ग्रहण पाहता आलं नाही. तर नागपुरातही ढगाळ वातावरणामुळे अनेकांना सूर्यग्रहण पाहता आलं नाही.