मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या ( kirit somaiya ) यांनी मुंबई पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि बांद्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केलीय.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, खार पोलीस ठाण्याच्या मार्गावर चौका-चौकात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. ज्या मार्गावरून किरीट सोमय्या यांच्या वाहनांचा ताफा जाणार आहे त्या मार्गांवर चौकांमध्ये मुंबई पोलीस त्यांना सुरक्षा देत आहेत.


खार पोलीस ठाणे येथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलताना किरीट सोमय्या यांनी सांगितले की, बांद्रा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली त्यात छेडछाड करण्यात आली आहे. माझ्या म्हणण्यानुसार तक्रार दाखल केली नाही. वेगळी तक्रार दाखल केली आहे. त्या एफआयआरवर माझी सही नाही.


मुंबई पोलिसांनी चीटिंग केलीय. उद्धव ठाकरे यांनी मला मारण्यासाठी जे गुंड पाठविले होते. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. काल दिल्लीत गेल्यावर लगेच एफआयआर दाखल करण्यात आली.


सोमय्या यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी शिवसैनिक १०० मीटर लांब होते. ते जवळ नव्हते, असे उत्तर दिल्ली गृह मंत्रालयाला देण्यात आलंय. ही माहिती चुकीचं असून जे जे अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केलीय. 


ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांच्यावर कारवाई होणार..  होणार..  होणार..  असे सांगत पोलीस अधिकाऱ्यांनाही इशारा दिलाय.