मुंबई : भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांचे कट्टर समर्थक अनिल कदम आणि प्रेसिला कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. मुंबई महानगर पालिकेच्या तोंडावर शिवसेना भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्के देतेय. काही दिवसांपूर्वी माजी आमदार कृष्णा हेगडेंच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे भाजपाला जोरदार धक्का बसला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता त्या पाठोपाठ अँटॉप हिल वडाळातल्या अनिल कदम आणि प्रेसिला कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. कदम यांचा हा प्रवेश आमदार कोळंबकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय.



हेगडेंच्या हाती शिवबंधन 


भाजप नेते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे (Bjp Leader Krishna Hegde) यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हेगडे यांनी शिवबंधन बांधले आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. आपण शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचे हेगडे यांनी यावेळी सांगितले.


मागील काही काळापासून ते भाजपमध्ये अस्वस्थ असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा यांनी बलात्काराची तक्रार दिल्यानंतर, कृष्णा हेगडे यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहून रेणू शर्मावर कारवाईची देखील मागणी केली होती. एवढेच नाही तर रेणू शर्मा यांनी आपल्यालाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले होते.