मुंबई : नव्या वातानुकूलित लोकलमध्येही महिला प्रवाशांसाठी राखीव बोगी असावी, अशी मागणी महिला प्रवाशांकडून करण्यात येत होती. दरम्यान ही मागणी मान्य करून पश्चिम रेल्वेने महिला राखीव बोगी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महिला प्रवाशांना सहज वातानुकूलित महिला राखीव बोगी ओळखता येणार आहेत.


या गाडीच्या दोन्ही दिशेला महिलांसाठीची राखीव बोगी निश्चित करण्यात आली आहे. सध्या वातानुकूलित लोकल निळया आणि चंदेरी रंगात आहे. तसेच प्रवाशांना सहज महिला बोगी ओळखता यावी, यासाठी राखीव बोगींना हिरवा रंग आणि त्यावर महिलेचे चित्र देण्यात आलंय. तसेच प्रवाशांना वातानुकूलित लोकलबाबत हरकती आणि सूचना ऑनलाइन नोंदविण्यासाठी अधिकृत संकेत स्थळावर व्यवस्था केलीये. एसी लोकलला अतिरिक्त थांबा द्या, मासिक प्रथम वर्ग पास वगळता अन्य पासधारकांना प्रवास करण्याची अनुमती द्यावी, अशा सूचनाही प्रवाशांनी यामध्ये केल्यात.