मुंबई : नव्या वर्षाच्या सुरुवातीला बेस्टने ग्राहकांना खास गिफ्ट दिलं आहे. आता खिशात सुट्टे पैसे सारखी ठेवायची कटकट नाही. बेस्टनं ग्राहकांना खास सेवा दिली आहे. आजपासून बेस्टचं ‘चलो स्मार्ट कार्ड’ सुरू होत आहे. कुलाबा, वडाळा आगारांतून हे कार्ड मिळेल. या कार्डाची किंमत केवळ 70 रुपये असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिकीट आणि पाससाठीचा रोख रकमेचा व्यवहार टाळता यावा यासाठी बेस्टने चलो स्मार्ट कार्ड सुरू केलं आहे. बेस्टच्या ‘चलो’ मोबाइल अ‍ॅपद्वारे किंवा ऑनलाइनही ते रिचार्ज करत येईल. तिकीट आणि पाससाठीच्या 72 सुपर सेव्हर योजनांचाही यातून लाभ घेता येईल.



तिकीट आणि पाससाठीचा रोख रकमेचा व्यवहार टाळता यावा यासाठी बेस्ट उपक्रमाने आज पासून ‘चलो स्मार्ट कार्ड’ प्रवाशांसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. हे कार्ड सुरुवातीला कुलाबा आणि वडाळा आगारातून उपलब्ध होईल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाने दिली.


या कार्डची किंमत 70 रुपये असणार आहे. या कार्डमध्ये ग्राहकांना 3 हजार रुपयांपर्यंत रिचार्ज करता येणार आहे. प्रवासासाठी लागणारं तिकीट शुल्क या कार्डमधून वजा होणार आहे. त्यासाठी हे कार्ड कंडक्टरकडे टॅब करायला द्यावं लागणार आहे. थोडक्यात हे स्मार्टकार्ड सारखं वापरता येणार आहे. 


याआधी बेस्टने प्रवाशांसाठी चलो मोबाईल अ‍ॅपही सुरु केले आहे. यातूनही तिकीट आणि पास काढतानाच बसची आताची स्थिती, बसमधील गर्दी, बसमध्ये बसण्याची व्यवस्था इत्यादी माहिती मिळू शकेल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कार्डवरील शिल्लक रक्कम कधीही मुदतबाहय होणार नाही