मुंबईची गती आज मंदावणार! तिनही रेल्वे मार्गावर विशेष मेगाब्लॉक
रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. सुट्टीचा दिवस एन्जॉय करण्यासाठी अनेक मुंबईक आगोदरच प्लानिंग करत असतात. त्यामुळे तुम्हीही असे काही प्लानिंग करून घराबाहेर पडणार असाल तर, आगोदर ही बातमी वाचा. कारण, आज मुंबईच्या तनही रेल्वे मर्गावर विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई : रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. सुट्टीचा दिवस एन्जॉय करण्यासाठी अनेक मुंबईक आगोदरच प्लानिंग करत असतात. त्यामुळे तुम्हीही असे काही प्लानिंग करून घराबाहेर पडणार असाल तर, आगोदर ही बातमी वाचा. कारण, आज मुंबईच्या तनही रेल्वे मर्गावर विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ या कालावधीत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर सकाळी ११.१५ सुरू झालेला मेगाब्लॉक दुपारी ४.१५ पर्यंत असणार आहे. त्यामुळे कल्याण ते ठाणे या मार्गावर ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत अप स्लो मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाईल. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी कल्याणहून सुटणाऱ्या अप स्लो आणि सेमी फास्ट लोकल कल्याण ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर वळवल्या जातील. तर, मुंलुंडपासून पुन्हा अप स्लो मार्गावर या लोकल वळवण्यात येतील. मेगाब्लॉक दरम्यान धावणाऱ्या गाड्यांची संख्याही मर्यादीत असेन.
मेगाब्लॉक दरम्यान ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर अप स्लो मार्गावरील लोकल थांबणार नाहीत. जे प्रवासी या स्थानकांनरुन प्रवास करती त्यांना ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याण मार्गे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर, सकाळी १०.०८ ते दुपारी ०२.४२ वाजेपर्यंत सीएसएमटीवरुन सुटणाऱ्या सर्व डाऊन फास्ट लोकल्स घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांवर थांबणार आहेत. तसेच, या लोकल्स नियोजित वेळापत्रकापेक्षा 15 मिनिटे उशिराने धावतील. कल्याणवरुन सुटणाऱ्या अप फास्ट लोकल्स दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. तसेच, त्या १५ मिनीटे उशिरा धावतील. हे वेळापत्रक सकाळी १०.२८ ते दुपारी ०३.०८ दरम्यान धावणाऱ्या लोकल्ससाठी असेल.
दरम्यान, हार्बर रेल्वे मार्गावरही मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. नेरुळ ते मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन रेल्वे मार्गांवर सकाळी 11.20 ते 04.20 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे मेगाब्लॉकदरम्यान
सीएसएमटीवरुन सकाळी १०.८ ते दुपारी 3.39 वाजेपर्यंत सुटणाऱ्या टणाऱ्या पनवेल, बेलापूर आणि वाशीसाठीच्या लोकल्स रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच अप मार्गावर सीएसएमटीसाठी सकाळी १०.५२ ते दुपारी ४.१२ वाजेपर्यंत निघणाऱ्या लोकल्सही रद्द करण्यात आल्या आहेत.
पश्चिम रेल्वेवरही सकाळी १०.३५ ते दुपारी ४.३५ या कालावधीत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. हा मेगाब्लॉक मरीन लाईन्स ते माहीम जंक्शन स्टेशनदरम्यान असेल. त्यामुळे डाऊन स्लो मार्गावरील सर्व लोकल डाऊन फास्ट मार्गावरुन धावतील आणि महालक्ष्मी, एलफिन्स्टन रोड, माटुंगा रोड स्थानकांवर थांबणार नाहीत. या कालावधीत पश्चिरम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वांद्रे आणि मुंबई सेंट्रलदरम्यान उलट मार्गाने प्रवास करण्याची सूट देण्यात आली आहे.