सेठ जी. एस. वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालयात 'सखी चार चौघी'च्या सहकायनि तृतीयपंथी समुदायासाठी विशेष ओपोडो सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या आठषवधापासून ही विशेष सेवा युरोलॉजी विभागातील बहुमजली इमारतीच्या आठव्या मजल्यावर दर शनिवारी दुपारी ३ वाजता असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतातील तृतीयपंथी समुदायाला विविध अडथळ्यांचा सामना करावा लागतो. या आव्हानांपैकी यूरोलॉजिकल आरोग्य समस्या विशेषतः गंभीर असतात. विशेषतः लिंगसंबंधी शस्त्रक्रिया करणाऱ्यांसाठी किंवा करण्याच्या विचारात असणाऱ्यांसाठी ही प्रक्रिया आव्हानात्मक असते. तृतीयपंथींच्या शस्त्रक्रियेनंतर मूत्रमार्गात संक्रमण, मूत्रमार्गातील गुंतागुंत आणि लघवीशी संबंधित समस्या उद्भवातत. मूत्रमार्गात कडकपणा, फिस्टुला आणि संसर्गचा धोका असतो.


का आहे आवश्यकता ? प्रशिक्षण आणि संवेदना।
तृतीयपंथी हेल्थकेअरमध्ये प्रशिक्षित आरोग्य सेवा व्यावसायिकांची संख्या वाढवणे.


धोरण सुधारणा : लिंग-पुष्टी प्रक्रियाआणि त्यानंतरच्या काळजीचा समावेश करणाऱ्या आरोग्य सेवा धोरणांसाठी समर्थन करणे.


समावेशक हेल्थकेअर कल्चर: असे हेल्थकेअर वातावरण तयार करणे, जिथे तृतीयपंथी व्यक्तींना सुरक्षित, आदरात्मक वाटेल.


रुग्णालयात तृतीयपंथीसाठी दर शनिवारी ही ओपीडी असेल. यासंदर्भातील नुकतीच गौरी सावंत आणि तृतीयपंथी समुदायातील सदस्यांसोबत बैठक झाली. त्यांना लागणाऱ्या सुविधा देण्यासाठी प्रशासन म्हणून प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती डॉ. संगीता रावत, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय यांनी दिली.