मुंबई : प्रभादेवीच्या आदर्शनगरमधील  ऋतिक दिलीप घडशी या दहावीच्या विद्यार्थ्याचा ह्रदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज दहावीचा पहिला पेपर देण्यापूर्वीच रात्री दिड वाजण्याच्या सुमारास झोपेतच त्याला हार्ट अटॅक आला. पण केईएम रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.


शिशूविहारचा विद्यार्थी


तो दादरच्या शिशूविहार शाळेत शिकत होता.


परिक्षेचा तणाव


ऋतिकच्या मृत्यूनंतर दहावीच्या परिक्षेचा तणाव पुन्हा एकदा चर्चेत आलाय.


ऋतिक आपल्या आई आणि दोन बहिणींसोबत राहत होता. वडिलांचे लहानपणीच निधन झालयं.


मृतदेह कुटुंबियांकडे


आई धुणीभांडी करून ऋतिकला शाळा शिकवत होती.  केईएम रूग्णालयात पोस्टमार्टेम करून  काही वेळापूर्वीच मृतदेह कुटुंबियांकडे सोपवला.


परीक्षेचा ताण घेऊ नका


दहावी, बारावीच्या परीक्षा या आयुष्यातील शेवटच्या परीक्षा अजिबात नसतात. यापुढे सुंदर आयुष्य आपली वाट पाहत असतं. त्यामुळे स्वत:ला ताण देऊ नका अस आवाहन वेळोवेळी करण्यात येत असतं.