SSR case : ६ तासांच्या चौकशीनंतर रियाला घरी सोडलं; उद्या पुन्हा चौकशी
ड्रग्जप्रकरणात एनसीबीने चौकशीसाठी बोलवलेल्या रिया चक्रवर्तीला 6 तासांच्या चौकशीनंतर घरी सोडण्यात आलं आहे.
मुंबई : ड्रग्जप्रकरणात एनसीबीने चौकशीसाठी बोलवलेल्या रिया चक्रवर्तीला 6 तासांच्या चौकशीनंतर घरी सोडण्यात आलं आहे. रियाला उद्या पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. रियाचा भाऊ शौविक आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि नोकर दीपेश सावंत हे एनसीबीच्या कोठडीत आहेत. रियाला आज चौकशीला बोलवल्यानंतर तिला अटक होईल, अशी चर्चा होती. पण चौकशीनंतर तिला घरी सोडण्यात आलं असून पुन्हा उद्या बोलवण्यात आलं आहे.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूतला ड्रग्ज आणून देण्यामध्ये सक्रिय भूमिका असल्याची कबुली रियाने एनसीबीला दिली असल्याची माहिती मिळत आहे. एनसीबी सुत्रांच्या माहितीनुसार, शौविक हा सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करत होता आणि ड्रग पेडलर जैद आणि बासिद याच्यामार्फत ड्रग्ज खरेदी केली जात होती. 17 मार्चचं जे ड्रग्जबाबतचं चॅट आहे, तेही आपलंच असल्याची कबुली रियाने दिली आहे.
रियाच्या या कबुलीनाम्याने तिच्या अडचणीत वाढ झाली आहे. जाणकारांच्या माहितीनुसार, रियाच्या या माहितीमुळे रियाला अटक होण्याची दाट शक्यता आहे.
रियाचा कबुलनामा?
सॅम्युअल मिरांडा 17 मार्चला ड्रग्ड घेण्यासाठी जैदकडे गेला होता, त्याची माहिती होती. ड्रग्जसाठी रिया आणि शौविक पेडलर जैदशी समन्वय साधून होते. शौविकच्या माध्यमातून रिया सुशांतसाठी ड्रग्ज मागवत होती. शौविक सुशांतसाठी ड्रग पेडलर बासितकडूनही ड्रग्ज खरेदी करत होता. रियाच्या या माहितीमुळे तिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.