मुंबई : ST Bus Strike : सटी कर्मचाऱ्यांनी कामावर परतणे यातच त्यांचं हीत आहे, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर त्यांनी टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. तसेच 41 टक्के पगारवाढ दिला आहे. विलीनीकरणाचा विषय न्यायालयात आहेत. त्यामुळे जी समिती नेमली आहे. त्यांच्या अहवालानंतर पुढील निर्णय होईल, असे सरकारकडून सांगण्यात आले. तरीही कर्मचारी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. परिवहनमंत्री अनिल परब यांनी आजपर्यंत जे कामावर रुजू होतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार नाही, असे स्पष्ट करताना जे येणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.


दरम्यान, शिवसेना संजय राऊत यांनी एसटी कर्मचाऱ्यांना सल्ला दिला आहे. कामगारांनी कामावर जाण्यातच त्यांचं आणि त्यांचं हित आहे. जे कोणी वकील आहेत. ते कामगारांना भडकावत आहेत. ते कामगारांना जगवायला येणार नाही, अशी टीका राऊत यांनी केली.


त्याचवेळी संजय राऊत यांनी एसटीचा संप सुरू नसल्याचा दावा केला आहे. कुठे संप सुरू आहे? नेते निघून गेले आहेत. अनेक कर्मचारी कामावर येत आहेत. काही लोक नौटंकी करत आहेत. त्यांना ती करू द्या. कामगार आता कामावर येण्याच्या मनस्थिती आहेत. त्यांना भरघोस वेतनवाढ दिली आहे. विलीनीकरणाचा विषय न्यायालयात आहेत. कामगरांनी कामावर जाण्यातच त्यांचं आणि त्यांचं हित आहे, असे राऊत म्हणालेत.



संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी काही लोक भडकावत आहेत. आम्ही गिरणी कामगारांची अवस्था पाहिली आहे. एसटी कर्मचारीही मराठी बांधव आहेत. त्यांनी शहाणपणाने आपला आणि आपल्या कुटुंबाचा विचार करावा आणि कामावर यावे, असं आवाहनही राऊत यांनी केले आहे. 


दरम्यान, काही कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. विलीनीकरण झाले नाही तर एसटी कर्मचारी संप सुरूच ठेवतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे संपाचा तिढा गुंतागुंतीचा बनला आहे. तर महामंडळ संपकऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.