एसटी महामंडळाच्या नव्या शिवशाही गाड्या, लोगोतही बदल
एसटी महामंडळाने कात टाकण्यास सुरुवात केली आहे. आधुनिक नव्या शिवशाही बसेस दाखल झाल्या आहेत. तर एसटी महामंडळाचा लोगोत बदल करण्यात आलाय. सध्या असलेल्या एसटीच्या चिन्हाखाली जय महाराष्ट्र असे महाराष्ट्राच्या नकाशासह असणार आहे.
मुंबई : एसटी महामंडळाने कात टाकण्यास सुरुवात केली आहे. आधुनिक नव्या शिवशाही बसेस दाखल झाल्या आहेत. तर एसटी महामंडळाचा लोगोत बदल करण्यात आलाय. सध्या असलेल्या एसटीच्या चिन्हाखाली जय महाराष्ट्र असे महाराष्ट्राच्या नकाशासह असणार आहे.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्या शिवशाही बसेस दाखल झाल्या आहेत. वातानुकुलीत ४७ आसनी बस, लॅपटॉप मोबाईल चार्जिंगची सोय, एलईडी स्क्रीन, वाय फाय अशा अत्याधुनिक सुविधा या बसमध्ये असणार आहेत. राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये ही बस धावणार आहे.
ज्या मार्गावर हिरकणी बस धावणार आहे. शिवशाहीचं भाडं हिरकणी घेणार आहे. एकूण १५०० शिवशाही बसेस या वर्षाअखेरपर्यंत एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.