एसटी कर्मचाऱ्यांची अखेर पगारवाढ
एवढ्या रुपयांनी पगार वाढला
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांची अखेर पगारवाढ करण्यात आली आहे. पाच वर्षे सेवा झालेल्या कनिष्ठ श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांसाठी चार हजार ते नऊ हजार पगारवाढ होणार आहे. तर तीन वर्षे सेवा झालेल्या कनिष्ठ श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांसाठी एक हजार ते पाच जार वेतनवाढ करण्यात येणार आहे. जे कर्मचारी नुकतेच आले आहे त्यांना 2000 रुपये वाढ देण्यात आली आहे..
त्याचप्रमाणे ज्येष्ठ कर्मचारी यांना 12 हजार वेतनवाढ देण्यात येणार आहे. तिकीट दरवाढीबाबत 15 जूननंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावतेंनी दिली आहे. वेतनवाढीमुळे एसटीच्या तोट्यात वाढ होणार असली तरी कर्मचारी भरती थांबवणार नसल्याचं रावतेंनी स्पष्ट केलं. ४७ हजार ते ५० हजार कर्मचाऱ्यांना नव्या वेतनवाढीचा लाभ होणार आहे.