मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट जाहीर झालीय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटी कर्मचाऱ्यांना 11 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांना अडीज हजार रुपयांची दिवाळी भेट मिळणार आहे. तर अधिकारी वर्गाला पाच हजार रुपयांची दिवाळी भेट जाहिर झालीय.


परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बोनसच्या निमित्ताने दिवाळीची भेट एसटी कर्मचाऱ्यांना घोषित केलीय. मागील वर्षीच्या जुलै महिन्यापासूनचे थकीत महागाई भत्ताही कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. दिवाळीपूर्वीच ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या हातात असेल असं रावते यांनी म्हटलंय. 


दिवाळी भेट आणि थकीत महागाई भत्त्यासाठी जवळपास 140 कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे. ही रक्कम एकत्रितपणे 17 ऑक्टोबर रोजी मिळणार आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील एक लाख सात हजार एसटी कर्मचाऱ्यांना होईल.