मुंबई :  राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी ४ दिवस संप पुकारला. ऐन दिवाळीत हा संप केला. त्यामुळे ऐन सणात प्रवाशांचे मोठे हाल झालेत. मात्र,  संपाची छळ सर्वांनाच सोसावी लागली. मात्र, संप का केला याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. संप करण्यामागे काय कारण आहे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेय. एसटी कर्मचाऱ्यांची स्थिती काय आहे, यावर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटी संपावर अनेकांनी टीका केली. तसेच न्यायालयाने हा संप बेकायदेशीर ठरवला आणि संप एसटी कर्मचाऱ्यांनी तात्काळ मागे घेतला. मात्र, कर्मचाऱ्यांच्या व्यस्था काही संपलेल्या नाहीत, असे शैलेंद्र आर. निसरगंध यांनी एक रॅप साँग तयार केलेय. याचा हा व्हिडिओ यूट्युबवर अपलोड केलाय. यात म्हटलेय...


कर मोठं मन, समतेचा राजा हो...आमच्यासाठी राजा हो..
महागाईच्या काळात जगणं फार वाईट आहे..
संसाराच्या एसटीला डिझेल जास्त लागतं...नाहीतर एसटीला ढकलावं लागतं


असे म्हणत एसटी कर्मचाऱ्यांना कसे कमी पगारात दिवस काढावे लागतात, यावर बोट ठेवले आहे. पाहा हा व्हिडिओ..



पगार कापातील स्थगिती


राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संपाचे हत्यात ऐन दिवाळीच्या सणात उपसले होते. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले होते. हा संप चार दिवस चालला. मात्र, संपावर गेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करताना ३६ दिवसांचा पगार कापण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत होती. या निर्णयाला स्थगिती देण्यात आली असून ४ दिवसांचा पगार कापण्यात येणार आहे.


चार दिवसांचा पगार कापण्यासाठी कर्मचाऱ्यांना त्यांची आठ दिवसांची रजा टाकावी लागणार आहे. तशी अट घालण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरील पगारकपातीचे संकट दूर झाले तरी त्यांची हक्काची रजा कमी होणार आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचारी याबद्दल काय भूमिका घेतील, याकडे लक्ष लागलेय. दरम्यान, आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीतर पुन्हा  जानेवारी २०१८ पासून संपावर जाण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिलाय.


एसटी प्रशासनाने संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचा ३६ दिवसांचा पगार कापणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सहा महिन्यांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने हा पगार कापण्यात येणार होता. प्रशासनाने संप बेकायदेशीर ठरवला होता. त्यामुळे संप केल्यानेदंडात्मक कारवाई म्हणून प्रत्येक दिवसाकाठी आठ दिवस याप्रमाणे कर्मचाऱ्यांचा पगार कापण्याची तरतूद नियमात आहे. त्यानुसार ३२ आणि संपाचे चार दिवस असा ३६ दिवसांचा पगार कापण्यात येणार होता.