शेतकरी कर्जमाफीसाठी एसटी महामंडळाची मदत
शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य एसटी महामंडळानं मदतीचा हात पुढे केला आहे.
मुंबई : शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य एसटी महामंडळानं मदतीचा हात पुढे केला आहे. एसटी महामंडळाचा अन्नदाता असलेल्या शेतक-यांच्या ऋणाची उतराई म्हणून एसटी महामंडळ शेतकरी कर्जमाफीसाठी पाच कोटींचं अर्थसहाय्य देणार आहे.
परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी ही घोषणा केली आहे. २२ जुलै हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिन आहे. मात्र आपल्या वाढदिवशी कोणत्याही जाहिराती न देता, शेतक-यांच्या मदतीसाठी सुरु केलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीत रक्कम जमा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. त्याला प्रतिसाद देत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी,एसटी महामंडळातर्फे पाच कोटींच्या अर्थसहाय्याची घोषणा केली.