मुंबई : एसटी संपावर तोडगा निघतोय असं १४ दिवसांनी आज वाटत होतं, पण अनिल परब, सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारने दिलेला पर्याय घोषित केला. १० वर्ष सेवा झालेल्यांना ५ हजार पगार वाढ, २० वर्ष सेवा झालेल्यांना ४ वर्ष पगारवाढ आणि २० वर्षांपेक्षा ज्यांची जास्त पगारवाढ झाली आहे, त्यांची २ हजार पगार वाढ ही ऑफर सरकारकडून दिली जात होती, पण ही पत्रकार परिषद जेव्हा मुंबईत आझाद मैदानावरील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी पाहिली. तेव्हा त्यांनी नाही - नाही आम्हाला हे मान्य नाही, विलिनीकरण हा शेवटचा आणि एकमेव पर्याय, असं म्हणून ते संपावर ठाम असल्याचं दिसून आलं.


गोपीचंद पडळकर काय म्हणाले...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा संप आम्ही पुकारलेला नाही, सरकारने दिलेल्या ऑफर विषयी आम्ही कर्मचाऱ्यांशी आझाद मैदानावर जावून बोलू, सरकारने जी ऑफर दिली आहे, जी पगारवाढ दिलेली आहे, ती एसटी कर्मचाऱ्यांना मान्य नाही. विलिनिकरणाच्या मुद्यावर एसटी कर्मचारी आजही ठाम आहेत, असं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.



परिवहनमंत्री अनिल परब काय म्हणाले...


सरकारने जी पगार वाढीची ऑफर कर्मचाऱ्यांना दिलेली आहे. ती विलिनीकरणावर निर्णय होईपर्यंत आहे, ज्या दिवशी विलिनीकरणाचा निर्णय होईल, तोपर्यंत संप परवडणारा नाही, म्हणून ही पगार वाढीची ऑफर दिलेली आहे, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे. 




२५ तारखेला सकाळी ८ ला कामावर हजर राहा - अनिल परब


आम्ही दिलेल्या ऑफरप्रमाणे कर्मचाऱ्यांनी सकाळी ८ वाजता कामावर हजर व्हावं, जे मुंबईत आलेले आहेत त्यांना एक दिवसाचा अवधी आम्ही देत आहोत, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. तसेच कर्मचाऱ्यांना पगारवाढीची ऑफर देऊनही, विचार केला नाही, तर सरकारला कडक पावलं उचलावी लागतील, असा इशारा दिला आहे.