दिवाळीत एसटी प्रवास महागणार
दिवाळीत एसटी प्रवास महागणार आहे. दिवाळीसाठी एसटी महामंडळानं 20 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलाय. सर्व प्रकारच्या बस सेवांमध्ये 10 ते 20 टक्के दरवाढ होणार आहे. 14 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत ही भाडेवाढ लागू असेल.
मुंबई : दिवाळीत एसटी प्रवास महागणार आहे. दिवाळीसाठी एसटी महामंडळानं 20 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलाय. सर्व प्रकारच्या बस सेवांमध्ये 10 ते 20 टक्के दरवाढ होणार आहे. 14 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत ही भाडेवाढ लागू असेल.
दिवाळीच्या सुट्टीमध्ये गावी जाणा-या प्रवाशांचं प्रमाण मोठं असतं त्यामुळे अनेकजण महिनाभर आधीच एसटीचं आरक्षण करुन ठेवतात. त्यामुळे सध्या तिकीट केंद्रावर वाढीव भाडे आकारणीला सुरुवात झालीये.
हंगामानुसार एसटीच्या भाड्यात 30 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा किंवा भाडे कमी करण्याचा अधिकार एसटी महामंडळाला राज्य परिवहन निगमनं दिलाय. त्यामुळे यंदाही दिवाळीसाठी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सलग तिस-या वर्षी एसटीची ही हंगामी भाडेवाढ होतेय..