मुंबई  MSRTC staff protest : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरील हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. आझाद मैदानात आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज करून बाहेर काढलं. (ST protesters at Azad Maidan) सर्व एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून हटवून  सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर बसवण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण त्यानंतर आंदोलकांना सीएसएमटी स्टेशनवरूनही हुसकावण्यात आलं आहे. तिकीट असेल तरच प्लॅटफॉर्मवर बसा अशा सूचना आंदोलकांना देण्यात आल्यायत. आंदोलकांची तिकीट तपासणी केली जातेय. काल आझाद मैदानातून हुसकावल्यानंतर आंदोलक सीएसएमटी स्टेशनवर ठिय्या मांडून बसले होते, पण आता पोलीस त्यांना यलो गेट पोलीस स्थानकात घेऊन जात आहेत. 


दरम्यान, आझाद मैदानातून मध्यरात्री पोलिसांनी 5 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं. आता त्यांची कुठलीच माहिती मिळत नाही. त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचा आरोप एका आंदोलक महिलेनं केला. यावेळ आंदोलकांना अश्रू अनावर झाले होते. आमचे सहकारी कुठे गेले,  त्यांना कुठे नेण्यात आलं, असे प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केले. 


विलीनीकरणाच्या मुद्यावर गेल्या पाच महिन्यापासून मुंबईच्या आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु होतं.