एलफिन्स्टन स्टेशनवरील चेंगराचेंगरीत २२ ठार
एलफिन्स्टन स्टेशनवर चेंगराचेंगरीत २२ जणांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबई : मुंबईत आज सकाळी अतिशय महत्वाची धक्कादायक घटना घडली आहे. एलफिन्स्टन स्टेशनवर प्रवाशांच्या चेंगराचेंगरीत २२ जणांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.
खाली पाहा, घटनेशी संबंधित LIVE UPDATE
चेंगराचेंगरीच्या घटनेत मृतांमध्ये ४ महिला
उद्धव ठाकरे, पियुष गोयल केईएम रूग्णालयात पोहोचले
आयसीयूत उपचार सुरू, गरज पडल्यास दुसऱ्या हॉस्पिटलला हलवणार - विनोद तावडे
एलफिन्स्टन चेंगराचेंगरीच्या घटनेत ४ महिलांचा समावेश
मृतांमध्ये १८ पुरूष, ४ महिला
रेल्वे प्रशासनाकडून दिरंगाई झाली हे मान्य करतो, भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया
जखमींमध्ये 4 जण अत्यवस्थ, आयसीयूत उपचार सुरू - विनोद तावडे
एलफिन्स्टन-परळ स्थानकाला जोडणारा, कायम वर्दळीचा एकमेव पादचारी मार्ग
मुंबईत सकाळी आलेल्या जोरदार पावसामुळे ही स्थिती उदभवली असल्याचं सांगण्यात येत आहे. पादचारी पुलावर गर्दीमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला, आणि पायऱ्यांवर चेंगराचेंगरी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
पावसामुळे अनेक प्रवासी हे प्लॅटफॉर्मवरच अडकले आणि नवीन येणाऱ्या लोकलमधील प्रवाशांमुळे गर्दीत आणखीनच भर पडली. एलफिन्स्टनच्या पादचारी पुलाच्या पायऱ्यांवर गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत २२ जणांचा मृत्यू तर २० ते २५ जण जखमी झाले असल्याचं सांगण्यात येत आहे.