दीपक भातुसे, मुंबई : मसुरीला कार्यक्रमासाठी निघालेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शासकीय विमानातून उतरवण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यपाल आज शासकीय विमानाने देहरादूनला आणि इथून कारने मसुरीला जाणार होते. यासाठी शासकीय विमानाची बुकींग करण्यात आल्याचं राज्यभवनातील सूत्रांनी सांगितलं. मात्र राज्यपाल विमानतळावर जाऊन शासकीय विमानात बसल्यानंतर परवानगी नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं. राज्यपाल त्यांनंतर दुपारच्या १२ वाजून १५ मिनिटाच्या स्पाईसजेटच्या विमानाने देहरादूनला रवाना झाले. मसुरीला IAS प्रशिक्षण समारोप कार्यक्रमासाठी राज्यपाल उद्या हजर राहणार आहेत. त्या कार्यक्रासाठी त्यांना शासकीय विमान हवे होते. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यपाल आणि महाविकास आघाडी यांच्यातील वाद आता विकोपाला जाण्याची शक्यता आहे. याआधी देखील अनेक मुद्द्यावर महाविकासआघाडीमधील नेत्यांनी राज्यपालांवर टीका केली होती. तर राज्यपाल यांनी ही ठाकरे सरकारमध्ये काहीतरी गडबड आहे असं वक्तव्य केलं होतं.


राज्यपाल विरूद्ध महाविकासआघाडी सरकार वाद आता शिगेला पोहचण्याची शक्यता आहे. महाविकासआघाडी सरकार सत्तेत येण्यापासून राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा वाद पाहायला मिळतो आहे. अनेक मुद्द्यांवर महाविकासआघाडी सरकार आणि राज्यपाल आमने-सामने आले आहेत.