मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विविध घटकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. शिंदेंनी नियमितपणे कर्जफेड शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचं अनुदान देण्यात येणार असल्याचं म्हटलंय. तसेच शेतकऱ्यांना वीज दरात सवलत देणार असल्याची घोषणाही यावेळेस केली. तसेच पोलिसांच्या निवासासाठी मास्टर प्लॅन तयार करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. (state government give farmers subsidy on loan and power also police quarters master plan cm eknath shinde big announcement after cabinet meeting)


मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नियोजित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचं अनुदान 


3 वर्षांची मुदत 2 वर्षांवर आणली


जवळपास 50 हजार शेतकऱ्यांना थेट फायदा होणार 


शेतकऱ्यांना वीज दरात सवलत देणार असल्याची घोषणा  


प्रति युनिट मागे 1 रुपयांची सवलत   


२.१६ पैशे ऐवजी 1.16 पैशे 


पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट मदत    


पैठणच्या सिंचन योजनेला मान्यता  


भातसा धरणासाठी 1550 कोटींची मान्यता 


15 मेडिकल कॉलेजमध्ये 50 जागा वाढवण्याचा निर्णय 


लोणार सरोवर विकास आरखड्याला मंजूरी, 370 कोटींची मंजूरी 


हळद संशोधन केंद्राला मान्यता, 100 कोटी रुपयांचं निधी     


संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघातील 40 गावांना फायदा


पोलिसांच्या घरासाठी मास्टर प्लॅन तयार करणार 


कोरोना काळातील गुन्हे तपास करुन मागे घेणार