मुंबई : मुंबई मेट्रो ही ट्राम आहे की रेल्वे आहे याचा निर्णय राज्य सरकारनं घ्यावा असं म्हणत मुंबई हायकोर्टानं या संदर्भातील याचिका निकाली काढली. घाटकोपर ते वर्सोव्हा ही मेट्रो १ सेवा मुंबई मनपानं मेट्रो ही ट्राम आहे असं म्हणत मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडे  १७०२ कोटी रुपयांच्या जकातीची मागणी केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमओपीएलनं या विरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती आणि कराची रक्कम माफ करण्याची मागणी केली होती. करातून सूट देण्याचे आदेश राज्य सरकारनं पालिकेला द्यावेत. तसंच मेट्रो ट्राम आहे की रेल्वे आहे याबाबत डिसेंबर २०१६ मध्ये केलेल्या निवेदनावर निर्णय घ्यावा अशी मागणीही MOPLनं केली आहे.


सप्टेंबर २०११ साली पालिकेनं मेट्रो रेल्वे मार्ग हा ट्राम वे असल्याचं जाहीर केलं होते. मेट्रो मात्र राज्य सरकारकडे मेट्रो हा रेल्वे मार्ग असल्याचं जाहीर करण्याचे निवेदन केलं होतं. या आधारे मेट्रोला पालिकेच्या सगळ्या करांमधून सूट मिळू शकते. आता राज्य सरकार नेमकं काय भूमिका घेईल हे पाहावं लागेल.