दीपक भातुसे, मुंबई : राज्याचं हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अधिवेशनाचा कालावधी किती असावा याबाबतचा निर्णय १ डिसेंबर रोजी परिस्थीतीचा आढावा घेऊन ठरवला जाणार आहे. ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे आमदार गिरीष महाजन यांनी यांनी यावरुन सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, 'किमान १५ दिवस अधिवेशन व्हावे ही आमची भूमिका आहे. हिवाळी अधिवेशन कालावधी कमी ठेवायचा, चर्चा फार करायची नाही अशी सरकारची भूमिका दिसते आहे. पळ काढण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. किमान अर्थसंकल्पीय अधिवेशन तरी नागपूरला व्हावे ही आमची मागणी होती.'


राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं की, 'शेतीच नुकसान, मराठा आरक्षण यावर सरकरला चर्चा करायची नाही असे वाटते आहे. प्रत्येक वेळी मुख्यमंत्री कोरोनाचे कारण देत असतील तर कोरोना स्थिती हातळण्सात कमी पडले का?'