मुंबईतील वाढीव अकृषिक टॅक्सच्या नोटिसांना स्थगिती
मुंबईतल्या हजारो गृहनिर्माण सोसायट्यांना बजावण्यात आलेल्या वाढीव अकृषिक कर म्हणजेच एनए टॅक्सच्या नोटिसांना स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे हजारो मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई : मुंबईतल्या हजारो गृहनिर्माण सोसायट्यांना बजावण्यात आलेल्या वाढीव अकृषिक कर म्हणजेच एनए टॅक्सच्या नोटिसांना स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे हजारो मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
२२ हजार गृहनिर्माण सोसायट्यांना दिलासा
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही स्थगिती दिली. मुंबईतल्या तब्बल २२ हजार गृहनिर्माण सोसायट्या आणि अन्य बांधकामांच्या जागांना वाढीव अकृषिक कर भरण्याची नोटीस महसूल विभागाकडून बजावण्यात आली होती. यामुळे मुंबईकरांमधे तीव्र नाराजीचा सूर होता.
२००८ पासूनचा अकृषिक कर
मुंबईसह राज्यभरातल्या रहिवासी क्षेत्रातल्या जमिनींवरच्या गृहनिर्माण सोसायट्यांसह इतरही हजारो इमारतींना, २००८ पासूनचा अकृषिक कर आकारण्यात आला आहे. शिवाय हा अकृषिक कर भरला नाही, तर त्यावर पुन्हा दंड ही आकारण्यात येत होता. त्यामुळे हा अचानकचा मोठा आर्थिक बोजा रहिवाशांवर पडला होता.