`शेअर बाजारात पडझड, छोट्या गुंतवणूकदारांनी वाट पाहावी`
भारतीय बाजारात सलग सहव्या दिवशी पडझडीचं सत्र सुरू आहे. आज सकाळी बाजार उडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार घसरण झाली. सेन्सेक्स 1200 अंकांनी तर निफ्टी साडे तीनशेहून अधिक अंकांनी कोसळला. दरम्यान, तज्ज्ञांनी छोट्या गुंतवणूकदारांना वाट बघण्याचा सल्ला दिलाय
मुंबई : भारतीय बाजारात सलग सहव्या दिवशी पडझडीचं सत्र सुरू आहे. आज सकाळी बाजार उडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार घसरण झाली. सेन्सेक्स 1200 अंकांनी तर निफ्टी साडे तीनशेहून अधिक अंकांनी कोसळला. दरम्यान, तज्ज्ञांनी छोट्या गुंतवणूकदारांना वाट बघण्याचा सल्ला दिलाय
जागतिक बाजारात काल रात्री आलेल्या विक्रीचेही पडसाद आज बाजारात उमटले. ही पडझड आणखी काही दिवस अशीच सुरू राहील असं तज्ज्ञांचं मत आहे.
तरीही दोन ते तीन वर्षासाठी गुंतवणूक करायाची असेल तर म्युच्यअल फंडाच्या मार्गानं गुंतवणूक करण्यास हरकत नाही, असा सल्ला बाजार तज्ज्ञांनी दिलाय.
जागतिक बाजारातील पडझडीचे भारतीय बाजारात पडसाद, सेन्सेक्स आणि निफ्टीची जोरदार आपटी, छोट्या गुंतवणूकदारांना वाट बघण्याचा सल्ला दिलाय.