निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : शेअर बाजारात सुरु असणरी प्रत्येक उलथापालथ आर्थिक गणितांवर थेट परिणाम करताना दिसते. त्यातच गेल्या काही दिवसांपासून या आर्थिक विश्वास मोठे चढ ऊतार पाहायला मिळत आहेत. (America, Europe, Asian countries) अमेरिका, युरोप आणि आशियाई शेअर बाजारात विक्रीची लाट आलीय. फिच या क्रेडिट रेटिंग एजन्सीने अमेरिकन सरकारचं क्रेडिट रेटिंग घटवलं आहे. त्यामुळेच अमेरिकेसोबत जागतिक शेअर बाजारांनी जोरदार आपटी खाल्ली आहे. त्याचा भारतीय शेअर बाजारातही मोठी पडझड होण्याची शक्यता आहे. (Stock Market News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारीच निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांकामध्ये सुमारे एक टक्का घसरण झाली. तर, रात्री बंद झालेले अमेरिकन आणि युरोपियन बाजारही एक ते दीड टक्का कोसळले आहेत . ज्यानंतर गुरुवारची सकाळ नव्या वळणावर नेताना दिसत आहे. गुरुवारी सकाळी आशियाई बाजारातही विक्रीचा जोर तासागणिक वाढतोय. इकडे आज भारतात आठवडी वायदा बाजारातील सौद्यांची मुदत संपणार असल्यामुळं त्याचा त्याचाही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. 


दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्थेबाबत मात्र परदेशी ब्रोकरेज कंपन्या सकारात्मक आहे. मॉर्गन स्टॅनली या ब्रोकरेज फर्मने भारताचं रेटिंग ओव्हर वेट केलंय. सध्या भारतीय बाजारात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या निकालाचा हंगाम सुरु आहे. आतापर्यंत आलेल्या निकाल बाजारच्या अपेक्षांच्या दृष्टीने संमिश्र आहे. बाजार निकालांना योग्य तो प्रतिसादही देत आहे. पण त्यातच फिचच्या अमेरिकन अर्थव्यवस्थेविषयीच्या भाष्यामुळे जागतिक बाजारात पडझड दिसतेय. याचा एकत्रित परिणाम म्हणजे भारतीय बाजारात काहीशी संभ्रमाची अवस्था निर्माण होऊ शकते. त्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांनी पुढील काही दिवस बाजारात गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांशी सल्लामसलत करणे क्रमप्राप्त बनले आहे.