मुंबई : शेअर बाजारात कोरोनो व्हायरसचा प्रभाव दिसून येत आहे. जगभरात कोरोनो भारतात नसल्याने बाजारात तेजी दिसून आली. सोमवारी शेअर बाजार तेजीसह सुरु झाला. दिवसभरातील शेवटचे सत्र वगळता बाजारात तेजी पाहायला मिळाले. आज सकाळीही बाजारात चांगली तेजी दिसून आली. जागतिक शेअर बाजारातील सेन्सेक्सने मंगळवारी   सुरुवातीच्या सत्रात ५०० अंकांची उसळी घेतली. सेन्सेक्सने उसळी घेतल्याने याचे खरेदीसाठी सकारात्मक परिणाम दिसून येत होते. सन फार्मा, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, हीरो मोटोकॉर्प, आयसीआयसीआय बँक आणि एचसीएल टेक यांच्या समभावाची खरेदी झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, दिल्लीत कोरोना विषाणूचे दोन नवे रुग्ण आढळल्याच्या वृत्तानंतर बाजारातील तेजीत घसरण झाली. सुरुवातीला सेन्सेक्स ७८५ अंकांच्या तेजीसह सुरू झाला. कोरोना विषाणू रुग्ण आढळ्याच्या वृत्तानंतर सेन्सेक्स ७०० पेक्षा अधिक अंकांनी घसरला. सोमवारी सुरुवातीला बाजारात चांगली तेजी पाहायला मिळाली होती. मात्र, ही तेजी शेवटपर्यंत कायम राहिली नाही. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १५३.२७ अंकांनी (०.४० टक्के) घसरत ३८,१४४.०२ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६९ अंकांनी खाली आला. ११,१३२.७५ अंकांवर बंद झाला.


कोरोना व्हायरसचा संसर्ग होत असल्याच्या भीतीमुळे शुक्रवारी जगभरातील बाजारात विक्रमी घसरण नोंदविण्यात आली होती. मात्र, सोमवारी शेअर बाजार तेजीसह सुरु झाला. आजही तेजी दिसून येत होती. मात्र, त्यानंतर घसरण पाहायला मिळाली आहे. दिल्लीत कोरोना विषाणूचे दोन नवे रुग्ण आढळल्याच्या वृत्तानंतर बाजारातील तेजीत घसरण झाली.  


दरम्यान, कोरोनाच्या भीतीमुळे गेल्या आठवड्यात जगभरातील शेअर बाजाराला पाच लाख कोटी डॉलरपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. यामुळे बाजारात एक दशकापेक्षा अधिक घसरण झाली आहे. बाजारांना झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर अमेरिकेच्या केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह, बँक ऑफ जपान आणि रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियाने धोरणात्मक पावले उचलण्याची तयार केली आहे.