मुंबई : अवघ्या देशात केवळ मुंबई महापालिका जकात गोळा करत होती. आज रात्री १२ वाजल्यानंतर जीएसटी लागू झाल्यावर जकात बंद होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरात सर्वत्र जीएसटी लागू होणार असल्याने मुंबई महापालिकेला सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या जकातीवर पाणी सोडावं लागणार आहे. पण याबजल्यान सरकारकडून भरपाई रक्कम पुढील पाच वर्षे मिळणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या आर्थिक स्थैर्यावर परिणाम होणार नाही. 


मुंबईच्या प्रमुख पाच जकात नाक्यांवर रात्री बारा वाजेपर्यंत आलेल्या सर्व गाड्यांना टोकन दिले जाईल आणि त्याच्यांकडून जकात घेतली जाईल. परंतु रात्री १२ नंतर आलेल्या गाड्यांकडून जकात वसूल केली जाणार नाही. मागील आर्थिक वर्षात बीएमसीला जकातीच्या माध्यमातून ७२७५ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. 


तर गेल्या तीन महिन्यांत १७०० कोटी रुपये जकातीद्वारे मिळाले होते. जकात विभागात तेराशे कर्मचारी काम करत असून आता त्यांना इतर विविध विभागांमध्ये पाठवले जाणाराय. तसंच जकात नाक्यांचे जागांचे काय करायचे, याबाबत अद्याप बीएमसी प्रशासनानं अद्याप ठरवलेले नाही.