Maharashtar Politial Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे (Shivsena) 35 हून अधिक आमदार असून काही अपक्षांचा देखील पाठिंबा आहे. शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीच्या सत्तेला धोका निर्माण झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील एकूण 42 आमदार सोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यात 35 शिवसेनेचे आणि 7 अपक्ष आमदारआहेत. हे सर्व गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये एकत्र दिसले. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले आहे. सध्या शिवसेनेतील आणखी आमदार शिंदे गटात सहभागी व्हावेत या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. शिंदे हे शिवसेना आमदारांशी संपर्क साधत आहेत.


त्यातच आता शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना जोदार सुरुवात करण्यात आली आहे. शिंदे गटाने विधानसभा उपाध्यक्षांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात शिंदे गटात असलेल्या सर्व आमदारांच्या सह्या आहेत. 


36 आमदारांचा कोटा पूर्ण झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटाकडून आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे. पक्षांतर बंदी कायद्यामुळे दोन तृतियांश आमदार असणं गरजेचं आहे, आमदार संख्या 36 असल्यास या कायद्यापासून सूट मिळते. त्यामुळे ही संख्या पूर्ण होईपर्यंत गेले दोन दिवस एकनाथ शिंदे गटाने वाट पाहिली. 


आता अपेक्षित आमदार संख्या पूर्ण झाल्याने एकनाथ शिंदे गटाकडून सत्तास्थापनेच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. एकनाथ शिंदे गटाकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना संपर्क साधण्यात आला आहे.